[ad_1]

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेचे यजमानपद भूषविण्यासाठी सज्ज असलेली राजधानी दिल्ली भारतीय कलाकृतींनी सजवण्यात आली आहे. परिषदेचे मुख्य ठिकाण असलेल्या ‘भारत मंडपम’मध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातील विशेष संस्कृती आणि कलाकृतींचे विशेष प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. यात महाराष्ट्रातील पैठणी व कोल्हापुरी चपलांचे खास दालनही असेल. त्याचप्रमाणे गोव्यातील क्रोशेट व लेसवर्कही येथे पाहुण्यांना पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी उपलब्ध असेल. केंद्र सरकारच्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ उपक्रमांतर्गत हे विशेष दालन सजवण्यात आले आहे.

पश्चिम भारत

महाराष्ट्र : कोल्हापुरी चप्पल आणि पैठणी
गोवा : क्रोशेट आणि लेसवर्क
केरळ : बेलमेटल वर्क
गुजरात : कच्छ आणि काठियावाडातील एम्ब्रॉयडरी आणि पाटण पटोला गुजरातच्या साड्या
राजस्थान : पिछवाई पेंटिंग आणि बांधणी (बांधेज)
मध्य प्रदेश : चंदेरी सिल्क साडी आणि टायगर पेंटिंग
छत्तीसगड : ढोकरा हस्तकला

उत्तर भारत

पंजाब : फुलकरी भरतकामाच्या वस्तू (दुपट्टे, साड्या, कुर्ते आणि पिशव्या)
जम्मू-काश्मीर : तांदळाचे पीठ, अॅक्रेलिक पेंट, लाकूड, टेराकोटा वापरून तयार केलेले पेपियर माचेपेपर
हरयाणा : पुंजा धुरी हा गालिचा
हिमाचल प्रदेश :मलमलीच्या कापडावर भरतकाम करून तयार केलेला चंबा रुमाल.
उत्तराखंड : फायबरपासून बनवलेल्या विशेष वस्तू
उत्तर प्रदेश : लखनऊची प्रसिद्ध चिकनकारी
राहुल गांधींची पुन्हा एकदा ‘भारत जोडो यात्रा’, पदयात्रेला कधी आणि कुठून सुरुवात होणार?
पूर्व भारत

बिहार : मधुबनी पेंटिंग
उत्तर प्रदेश : बनारसी साडी आणि बनारसचेच ब्रोकेड डिझाइन
पश्चिम बंगाल : कंठा एम्ब्रॉयडरी
झारखंड : आदिवासींचे दागिने

ईशान्य भारत

मणिपूर : काउना नावाच्या मऊ आणि चिमट्या नामक गवतापासून तयार केलेल्या कलात्मक वस्तू
ओडिशा : पट्टाचित्र पेंटिंग
आसाम : मेखला बेडशीट, साड्या, शाल, स्टोल आणि खास आसामी हातमाग उत्पादने
मेघालय : बांबू आणि उसापासून बनवलेल्या वस्तू
नागालँड : लोईन लूम विणकाम करून बनविलेली वस्त्रे

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *