[ad_1]

मुंबई : पश्चिम आशियाई देशात वाढत्या तणावाच्या भीतीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून जगभरात सोन्याची मागणी झपाटयाने वाढली आहे. क्रूड ऑइलच्या (कच्चे तेल) घडामोडी आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून यावर्षी तीनदा व्याजर कपात करण्याच्या शक्यतेमुळेही सोन्याच्या किंमतीत दरवाढीचे सत्र सुरूच आहे. जागतिक तसेच भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीचे भाव कडाडले असून दरवाढीचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाही. सोन्याचा वायदा ७९ हजार रुपयांच्या वर तर चांदीचा वायदा ८० हजार रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे.आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने-चांदी चमकले
दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत असून मार्च महिन्याच्या शेवटीपासून सोन्याच्या किंमतीत दरवाढ सुरू झाली जी आता नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार दिवसात नव्या शिखरावर पोहोचली आहे. दरम्यान, आज आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या फ्युचर किंमतीत मोठी वाढ दिसून येत असून सोन्याच्या दराने उच्चांक गाठला तर चांदीच्या फ्युचर्सच्या किमतीही सातत्याने वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस २,३०० डॉलरवर पोहोचली असताना व्यवहार दरम्यान सोन्याने आंतरराष्ट्रीय बाजारात २,३०४.९६ डॉलर प्रति औंसचा सर्वकालीन उच्चांक गाठला.
Gold Silver Price: सोने-चांदीत विक्रमी तेजी, महागाईने तोडले आजवरचे सर्व रेकॉर्ड
सोन्याच्या दरवाढीमागे यूएस कनेक्शन
अमेरिकेची केंद्रीय बँक, यूएस फेड रिझर्व्हचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांचे अलीकडेच विधान सोन्याच्या दरवाढीचे मुख्य कारण मानले जात आहे. अमेरिकेतील महागाई अजूनही लक्ष्यापेक्षा जात आहे, परंतु व्याजदर कपात यावर्षी कधीही सुरू होऊ शकते असे फेड रिझर्व्ह अध्यक्षांनी म्हटले. कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठातपॉवेल यांनी आपल्या संबोधनात व्याजदर कपातीचे संकेत दिले असून सोने आणि चांदीच्या दृष्टीने व्याजदर कपात चांगली असल्यामुळे फेड रिझर्व्ह अध्यक्षांच्या विधानामुळे सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होत आहे.
आजोबांची पुण्याई अन् नातवाला लागली लॉटरी, झटक्यात झाला लखपती; कसं ते वाचाच

भारतात सोने आणि चांदीच्या किंमती

सोन्या-चांदीच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून सराफा बाजारात वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही धातूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा एप्रिल वायदा २२१ रुपयांनी वाढून ६९,९९९ रुपयांवर पोहोचला आहे. त्याचवेळी मे चांदीचे फ्युचर्स १८६ रुपये वाढीसह ७९,६३० रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे सराफा बाजारात सोन्या आणि चांदीची झळाळी वाढली आहे.

सोन्याची किंमत ७० हजार रुपयांच्या दिशेने अग्रेसर आहे तर चांदीचा भावही महागाईच्या रथावर स्वार झाला आहे. देशभरात १० ग्रॅम २४ सोन्याची किंमत ६९,८९० रुपये असून बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६३,९५६ रुपये तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ६९,७७० प्रति १० ग्रॅम झाली आहे.

Read Latest Business News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *