अमिताभ बच्चन यांनी सेटवर हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. यामध्ये जया बच्चन सुरुवातीला खूपच गंभीर दिसत होत्या, पण जेव्हा बिग बींनी त्यांच्याकडे मोबाईल फिरवला तेव्हा त्या हसायला लागल्या. हे शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये ‘कामावर’ असे लिहिले आहे.
अमिताभ बच्चन यांचा व्हिडिओ पहा
चाहत्यांची मजेशीर कमेंट
बिपाशा बसू, नव्या नंदा, श्वेता बच्चन, मौनी रॉय यांच्यासह अनेक प्रसिद्ध कलाकारांनी या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्याचवेळी एका चाहत्याने लिहिले की, ‘फक्त अमितजीमध्ये जया जींना क्लिक करण्याची हिम्मत आहे.’ दुसर्याने लिहिले की, ‘तुमची पत्नी क्वचितच हसते. तुम्हीच त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकता. तर काहींनी लिहिले, ‘मी कधीच त्यांच्या रागावलेल्या चेहऱ्यावर आनंद किंवा हसू पाहिलं नाही.’
५० वर्षांपूर्वी लग्न झाले
अमिताभ बच्चन यांनी 3 जून 1973 रोजी जया बच्चन यांच्याशी विवाह केला. ७० च्या दशकात अमिताभ बच्चन यांचे नाव रेखासोबत जोडले गेले होते. दोघांनी ‘दो अंजाने’, ‘खून पसीना’, ‘गंगा की सौगंध’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले होते. मात्र, दोघांनीही त्यांचे नाते उघडपणे स्वीकारले नाही.