[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, पुणे: घटस्फोटाला आईच जबाबदार असल्याच्या कारणावरून मुलाने आईचा गळा चिरून निर्घृण खून केल्याचा प्रकार खडकी परिसरात घडला. गुंफाबाई शंकर पवार (वय ५५, रा. श्रीरामपूर, नगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, ज्ञानेश्वर शंकर पवार (वय २९, रा. खडकी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकी पोलिसांनी आरोपी मुलाला अवघ्या काही तासांत शिर्डी परिसरातून ताब्यात घेतले.

हा प्रकार रविवारी सकाळी ९.३० वाजता उघडकीस आला. त्यानंतर खडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेली महिला श्रीरामपूर तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी आहे. त्यांना दोन मुलगे असून, एक खडकीत आणि दुसरा देहूरोड येथे राहतो. त्या मुलांना भेटण्यासाठी पुण्यात आल्या होत्या. शनिवारी त्या खडकीतील मुलगा ज्ञानेश्वरकडे मुक्कामी होत्या. ज्ञानेश्वर खडकी येथील दारुगोळा कारखान्यात कामाला होता. तो एकटाच तेथे राहतो. त्याचा घटस्फोट झाला आहे. त्याच्या घटस्फोटाला आईच जबाबदार असल्याचा त्याचा समज होता. त्या गोष्टीचा राग त्याच्या मनात होता. त्यातूनच त्याने शनिवारी रात्री आई झोपल्यानंतर चाकूने गळा चिरला. त्यानंतर ज्ञानेश्वर घराला बाहेरून कुलूप लावून पसार झाला.
आईचं छत्र हरपलं, १८ वर्षानंतर वडिलांची भेट, लेकाच्या डोळ्यात अश्रू तरळले अन् दुरावा संपला
दुसऱ्या दिवशी सकाळी मृत महिलेच्या मोबाइलवर नातेवाइक फोन करीत होते. मात्र, समोरून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. ज्ञानेश्वरला फोन केल्यानंतर तोही फोन उचलत नव्हता. त्यामुळे काही नातेवाईकांनी ज्ञानेश्वरच्या देहूरोड येथे राहणाऱ्या भावाला फोन केला. त्यानेही आई आणि ज्ञानेश्वरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. संपर्क न झाल्याने त्याने खडकीतील घरी येऊन पाहणी केली. त्या वेळी घराबाहेर आईची चप्पल होती. मात्र, घराला बाहेरून कुलूप होते. त्या मुलाने खिडकीचा दरवाजा ढकलून आत पाहिल्यानंतर रक्ताचा सडा दिसून आला. त्या मुलाने लगेच खडकी पोलिसांना माहिती दिली. खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गिरीश दिघावकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

…असा आला मुलावर संशय

खडकी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घराला बाहेरून कुलूप होते. मृत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने सुस्थितीत होते. मुलगा ज्ञानेश्वर तेथे नव्हता. तो कोणाचेच फोन घेत नव्हता. त्याचा फोनही बंद झाला. त्यावरून ज्ञानेश्वरनेच आईचा खून केला असावा, अशी शंका खडकी पोलिसांना आली. त्यांनी तांत्रिक तपास करून ज्ञानेश्वरच्या मोबाइलच्या लोकेशनवरून त्याचा ठावठिकाणा लावला. त्याला शिर्डी येथील पुणतांबे गावाच्या हद्दीतून ताब्यात घेतले.

ज्याच्या धाकाने कोथरुड थरथर कापायचं, कुख्यात गुंड शरद मोहोळचा भरदिवसा करेक्ट कार्यक्रम

महिलेच्या खुनाची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आढावा घेतला. पसार झालेल्या मुलाने खून केला असण्याच्या शक्यतेतून तपास सुरू केला. काही तासांच्या आता खून करणाऱ्या मुलाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. – गिरीश दिघावकर, वरिष्ठ निरीक्षक, खडकी पोलिस ठाणे

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *