[ad_1]

वृत्तसंस्था, केरन (जम्मू-काश्मीर) : जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) किशनगंगा नदीच्या काठावर असलेले टपाल कार्यालय आता भारताचे ‘पहिले’ टपाल कार्यालय म्हणून ओळखले जाईल. पिन कोड क्रमांक १९३२२४ – असलेले हे टपाल कार्यालय आजवर भारतातील शेवटचे म्हणून ओळखले जात होते.

हे टपाल कार्यालय पाकिस्तानव्याप्त काश्मीरपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. ‘पूर्वी हे देशातील शेवटचे टपाल कार्यालय म्हणून ओळखले जात होते, कारण त्यापलीकडे आपण टपाल साहित्य पोहोचवू शकत नाही. मात्र, लष्कराने याला देशातील पहिले टपाल कार्यालय असे नाव दिले. ते एलओसी किंवा सीमेवरील अंतराच्या दृष्टीने पहिले टपाल कार्यालय आहे’, अशी माहिती टपाल विभागाच्या बारामुल्ला सर्कलचे अधीक्षक अब्दुल हमीद कुमार यांनी दिली. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी किंवा पाकिस्तान अस्तित्वात येण्यापूर्वी हे टपाल कार्यालय कार्यरत होते, असे गावातील लोकांचे म्हणणे आहे. १९६५ व १९७१मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धादरम्यान तसेच सीमेपलीकडून वारंवार घडणाऱ्या गोळीबाराच्या घटनांदरम्यानही हे टपाल कार्यालय सेवा देत होते.

शेतकऱ्यांना खत, रेशन कार्ड मिळेना; गुलाबरावांकडून अधिकाऱ्याची कान उघडणी

पूर्वी जोखमीचे काम

‘२०२१मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा करार झाला. तत्पूर्वी बाहेर जाणे, टपाल पोहोचवणे किंवा टपाल जमा करणे खूप जोखमीचे होते’, असे टपाल कार्यालयाचे पोस्ट मास्तर शकीर भट यांनी सांगितले. भट यांची नियुक्ती टपाल विभागात १९९२मध्ये झाली. तर, १९९३मध्ये आलेल्या महापुरामध्ये हे टपाल कार्यालय वाहून गेले होते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *