[ad_1]

इम्फाळ : मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याच्या प्रकरणाचे पडसाद सर्वत्र उमटले असतानाच, येथे लैंगिक अत्याचाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. चुराचांदपूर जिल्ह्यातील ३७ वर्षांच्या विवाहितेने आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. ३ मे रोजी या महिलेच्या घराला आग लावल्यानंतर ती पळून जात असताना, एका गटाने तिच्यावर बलात्कार केला. याच दिवशी राज्यात वांशिक हिंसाचारास सुरुवात झाली होती, असे पोलिसांनी सांगितले.

बिष्णूपूर महिला पोलीस ठाण्यात या प्रकरणी ९ ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर तो पुढील तपासासाठी चुराचांदपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला, अशी माहितीही पोलिसांनी दिली. चुराचांदपूर जिल्ह्यात खुमुजांबा मैतेई लेकाई येथे अज्ञात कुकी समुदायातील पुरुषांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला, असे ‘एफआयआर’मध्ये नोंदवण्यात आले आहे. ३ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कुकी दहशतवाद्यांच्या एका गटाने या महिलेच्या घरासह अनेक घरांना आग लावली. या गोंधळात तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. सुमारे अर्धा किलोमीटर धावल्यानंतर तिला काही व्यक्तींनी रोखले आणि तिच्यावर बलात्कार केला, असे पोलिसांनी ‘एफआयआर’च्या हवाल्याने सांगितले.

मणिपूरचा वापर राजकारणासाठी करू नका, अविश्वास प्रस्तावावरून PM मोदींनी विरोधकांना सुनावलं
नि:शस्त्रीकरणासाठी आमदारांचे पत्र

मणिपूरमध्ये शांतता आणि सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्यासाठी राज्यात पूर्ण नि:शस्त्रीकरण गरजेचे आहे, अशी विनंती येथील ४० आमदारांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. यापैकी बहुतांश आमदार मैतेई समुदायातील आहेत. कुकी दहशतवादी गटांसोबत केलेले ‘सस्पेन्शन ऑफ ऑपरेशन्स’करार मागे घ्यावेत, राज्यात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची (एनआरसी) अंमलबजावणी करावी आणि स्वायत्त जिल्हा परिषदांचे (एडीसी) बळकटीकरण करावे, अशा मागण्याही याद्वारे करण्यात आल्या. तसेच स्वतंत्र प्रशासनाच्या कुकी गटाने केलेल्या मागणीला या आमदारांनी विरोध दर्शवला. ‘सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी केवळ सुरक्षा दले तैनात करणे पुरेसे नाही. राज्यातील सीमावर्ती क्षेत्रातील हिंसाचार रोखणे गरजेचे आहे. हे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी पूर्ण नि:शस्त्रीकरण महत्त्वाचे आहे,’ असेही या पत्रात म्हटले आहे.

इम्फाळमध्ये महिलांचा मोर्चा

संसदेचे पावसाळी अधिवेशन संपण्याआधी मणिपूर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी करत शेकडो महिलांनी इम्फाळमध्ये मशाल मोर्चा काढला. इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील केसामपट, केसामथाँग, क्वाकेठेल आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील वांगखेई, कोंगबा येथे बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मोर्चे काढण्यात आले. ‘विधानसभा अधिवेशनात राज्याच्या प्रादेशिक अखंडतेचे संरक्षण करण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर करायला हवा आणि संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने तो संसदेकडे पाठवायला पाहिजे, असे मोर्चात सहभागी इंगूदम बबिता यांनी वांगखेई येथे पत्रकारांना सांगितले. कुकी गटाच्या स्वतंत्र प्रशासनाच्या मागणीविरोधात आणि राज्यात एनआरसीची अंमलबजावणी करण्यासाठी महिलांनी घोषणाबाजीही केली.

सरकारच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला; काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींचे निलंबन

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *