[ad_1]

मुंबई- ‘पठाण’नंतर शाहरुख खान त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटातून चाहत्यांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत असताना, बॉलिवूडच्या किंग खानने १० ऑगस्ट रोजी ट्विटरवर ‘AskSRK’ सेशन घेतले. सत्रादरम्यान, अभिनेत्याने चाहत्यांच्या मजेदार प्रश्नांची उत्तरे दिली. एका चाहत्याला तर तो शिवी द्यायला कुठून शिकला आणि त्या कोणत्या आहेत याचे उत्तर दिले.

शाहरुख खानने १० ऑगस्ट रोजी ‘जवान’ संदर्भात ‘आस्क मी सेशन’ केले. तसेच सुपरस्टारने अॅटलीच्या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर देखील रिलीज केले, ज्यामध्ये तो, नयनतारा आणि विजय सेतुपती एकाच फ्रेममध्ये आहेत. पोस्टर रिलीज झाल्यानंतर, अभिनेत्याने चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे देत ट्विटरवर ‘आस्क मी सेशन’ केले. यामध्ये शाहरुखने चाहत्यांच्या भन्नाट प्रश्नांनाही उत्तरे दिली.

बाई म्हणजे वॉशिंग मशीन आहे का? कंगना रणौतचं वादग्रस्त वक्तव्य पुन्हा चर्चेत
शाहरुख खान आणि मजेदार सेशन

या सेशनदरम्यान एका चाहत्याने शाहरुखला ‘किमान मला शिव्या द्या, पण उत्तर द्या’ असे म्हटले. यावर शाहरुख हसला आणि म्हणाला, ‘तेरी बात का बैदा मारुं. मी जॅकी श्रॉफकडून ही शिवी शिकली आहे. हाहाहा.’ सेशनदरम्यान एका चाहत्याने विचारले, ‘शाहरुख सर, तुम्ही हॉरर फिल्म कधी करणार?’ या प्रश्नावर अभिनेत्याने लिहिले, ‘मी हे प्रत्येक वेळी करतो…नेहमी एकटा येतो…माझा मित्र यश म्हणाला होता…जो एकटा येतो…तो असतो एक राक्षस.’

VIDEO: छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? M. Sc. B. Ed. शिक्षिकेला आलं नाही उत्तर
शाहरुखचे चोख उत्तर

जवान पाहायला जाण्याबाबत एका चाहत्याने आपल्या प्रेयसीला विचारले. त्याने लिहिले की, ‘मी प्रेयसीला त्या जवान पाहायला जाऊ असे म्हटले. त्यावर ती माझा जवान तर तूच आहेस. मला शाहरुखला बघायचे नाही. यावर चोख उत्तर देताना शाहरुख खानने लिहिले की, ‘ठीक आहे भाऊ, तिचे ऐका. सिनेमाची कथा दुसऱ्या कोणाकडून तरी ऐका. तिला विचारा त्याचा दुसरा चित्रपट पाहणार का. त्याचं नाव डंकी नाहीतर त्यालापण म्हणेल तू डंकीसारखा दिसतोस.’

नवीन ‘जवान’ पोस्टर


शाहरुख खानने 10 ऑगस्ट रोजी ‘जवान’चे नवीन पोस्टरही दाखवले. ज्यामध्ये तो, नयनतारा आणि विजय सेतुपती एकाच फ्रेममध्ये दिसत होते. नवीन पोस्टरच्या प्रत्येक कोपऱ्यात स्वॅग दिसत आहे. हे शेअर करत शाहरुख खानने लिहिले, द डेअरिंद. द डॅझलिंग. द डेंजरस. जवान ७ सप्टेंबर २०२३ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये जगभरात प्रदर्शित होईल.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *