[ad_1]

मुंबई– सुनील शेट्टी आणि त्याची पत्नी माना शेट्टी यांच्या लग्नाला ३० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु त्यांच्यातील प्रेम आजही असे आहे की नवीन जोडपेही त्यांच्यासमोर फिके दिसू लागतात. मात्र, या प्रेमाचे लग्नात रुपांतर करण्यासाठी दोघांना खूप धडपड करावी लागली होती. प्रत्येक अडचणीचा सामना करत हे जोडपे दिवसेंदिवस अधिक मजबूत होत गेले. हे मजबूत बंध आणि प्रेम टिकवून ठेवण्यासाठी, हे स्टार जोडपे काही न सांगितल्या गेलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करते, ज्यापासून इतर जोडपी देखील शिकू शकतात.
जॅकी श्रॉफने शाहरुखला शिकवलेली ही शिवी, asksrk सेशनमध्ये अभिनेत्याने स्पष्टच सांगितलं
पहिल्या नजरेतील प्रेम आणि अडचण

सुनील शेट्टी पहिल्या नजरेतच मानाच्या प्रेमात पडला होता. तिचे मन वळवण्यासाठी अभिनेत्याने तिची बहीण आणि कॉमन फ्रेंडची मदत घेतली. असेच एकदा दोघेही बाईक राईडवर गेलेले, तेव्हा मानानेही आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र, त्यांच्या प्रेमाला कुटुंबीयांची परवानगी मिळण्यासाठी ९ वर्षे लागली. खरंतर मान अर्धी मुस्लिम आणि अर्धी पंजाबी होती, तर सुनील तेलुगू होता. या फरकामुळे त्यांचे लग्न होणार नाही, असे दोघांच्या कुटुंबीयांना वाटत होते. मात्र, शेवटी दोन्ही कुटुंबांना त्यांच्या प्रेमापुढे नमते घ्यावे लागले. आता इतक्या वर्षांनंतरही हे जोडपे सुखी वैवाहिक जीवन जगत आहे.

या जोडप्यामध्ये असे काय आहे, जे त्यांचे प्रेम एक टक्काही कमी होऊ देत नाही?

एकत्र गोष्टी करणे

माना शेट्टीने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘एकत्र गोष्टी केल्याने विवाहित जोडप्याला बंध मजबूत राहण्यास मदत होते’. याशिवाय, लग्नानंतरही ‘तुम्ही जसे दिसाता किंवा काय करता यावरून परस्पर आकर्षण आणि उत्साह टिकवून ठेवणे आवश्यक आहे’ असेही सांगितले. प्रत्येक गोष्टीसाठी एका जोडीदारावर अवलंबून राहू नये, अन्यथा जोडपे एकमेकांना ओझे समजू लागतात, असेही ती म्हणाली. दोन्ही साथीदार स्वतंत्र असण्याचा मुद्दाही मानाने सांगितला होता.

वाट्याला आलं न संपणारं दु:ख; पत्नीला अखेरचा निरोप देताना अभिनेत्याला आवरला नाही हुंदका
पती आणि पत्नी ही चूक करतात

लग्नानंतर पती-पत्नी एकमेकांच्या सहवासात इतके रिलॅक्स होतात की ते त्यांच्या दिसण्यापासून इतर गोष्टींकडे लक्ष देणे सोडून देतात. यामुळेच अनेक वेळा ते इतर लोकांकडे आकर्षित होऊ लागतात. जोडप्यांनी एकमेकांची तसेच स्वतःची काळजी घेतली पाहिजे. विशेष म्हणजे त्यांनी त्यांची स्वतंत्र ओळख गमावू नये. तसेच, त्यांनी लग्नाआधी सारखाच चांगला वेळ घालवला पाहिजे, जेणेकरून त्यांचे नाते कमकुवत होणार नाहीत.

सुनील स्वतःलाच प्रश्न विचारतो

बीटाउनमध्ये मोठे नाव बनण्याआधीच सुनील शेट्टीने लग्न केले. लग्न झाल्यानंतरही त्याचे नाव अनेक सुंदरींशी जोडले गेले. एकदा त्याला असंही विचारलं गेलं की ‘त्याला दुसरीबद्दल आकर्षण वाटत नाही का?’ यावर अभिनेत्याने उत्तर दिले, ‘जेव्हा हे घडते तेव्हा मी स्वतःला विचारतो की हे क्षणिक आकर्षण मी सर्वकाही गमवावे या लायक आहे का?’ साहजिकच उत्तर ‘नाही’ असेच असते.

एअरपोर्टवर स्वतःच्या जाहिरातीचं पोस्टर दिसलं, सुनील शेट्टी कुतूहलानं बसून पाहू लागले

हा प्रश्न उपयुक्त आहे

हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त ठरू शकतो. आकर्षण कोणालाही केव्हाही होऊ शकते, परंतु हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे की त्याला प्रेम आणि कुटुंबाशी प्रामाणिक राहून आनंदी व्हायचे आहे की नाही?

संवाद आणि आदर

एकमेकांमध्ये कम्युनिकेशन गॅप येऊ न दिल्याने नातं जास्त काळ टिकू शकतं, असं माना शेट्टीने सांगितलं होतं. जोडप्याने प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत शेअर केली पाहिजे आणि ते चांगले श्रोतेही असले पाहिजेत, असे ती म्हणाली होती. यासोबतच ‘एकमेकांना जज करू नका’ असा सल्लाही दिला. सुनील शेट्टी आणि त्याची पत्नी परस्पर आदर राखण्याचा आग्रह धरतात. त्यांच्या मते, दीर्घ संबंधासाठी हे खूप महत्वाचे आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *