[ad_1]

रत्नागिरी: अलीकडे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. असाच एक भीषण अपघात खेड तालुक्यात कुंभाड ते खोपी या मार्गावर झाला आहे. भरधाव रिक्षा टेम्पोने दुचाकीस्वाराला उडवल्याने २३ वर्षे युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अंकित तांबे (२३, रा. कुंभाड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
मध्यरात्री घरात घोरण्याचा आवाज, जाऊन पाहिलं तर चोर झोपलेला, विचित्र घटनेने साऱ्यांना आश्चर्य
मिळालेल्या माहितीनुसार, अंकित तांबे हा चार दिवसांपूर्वीच मुंबई येथून आपल्या मावस भावाच्या लग्नासाठी गावी आला होता. तो आयनी मेटे येथे लग्नाच्या हळदीसाठी निघाला होता. यावेळी मन हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना घडली. अंकित हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. हे कुटुंब मुंबईत नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास आहे. अंकितच्या अपघाती मृत्यूने कुंभाड परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मावस भावाच्या लग्नासाठी आलेल्या अंकितच्या मृत्यूने या सोमवारी झालेल्या लग्नावेळी दुःखाचं सावट होतं, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

खोपी ते कुंभाड जाणाऱ्या रोडवर किन्नांचा वाडा येथे अपघात झाला. टेम्पोचालक शुभम घोरपडे रा. मिर्ले हुंबरवाडी याने हयगयीने बेदरकारपणे भरधाव वेगाने गाडी चालवली. त्यानंतर दुचाकीला समोरुन धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या भीषण अपघातात अंकित तांबे यास डाव्या डोळ्याला, तोंडाला आणि छातीला गंभीर स्वरुपाच्या दुखापती होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या रुपेश सावंत याच्या डोक्याला आणि तोंडाला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी कळंबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

एकनाथ खडसेंची तब्येत ठणठणीत, जळगावातील निवासस्थानी पोहोचताच जोरदार स्वागत

रविवारी सायंकाळी उशिरा हा अपघात झाला होता. कुंभाड बैद्धवाडी येथील राजेंद्र जानु तांबे यांनी या अपघात प्रकरणाची फिर्याद खेड पोलीस स्थानकात दाखल केली आहे. शुभम संतोष घोरपडे रा. मिर्ले हुंबरवाडी या संशयित टेम्पो चालकावर या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघात प्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *