प्रियांका पाटील शेळके – बोबडे
अहमदनगर: पतीने पत्नीला त्रास दिल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. या घटना अनेक वेळा विकोपाला गेल्याचेही समोर आले आहे. या सगळ्या घटना रागाच्या भरात घडतात. दरम्यान नगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केडगावमध्ये एका पत्नीने पतीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात पती जखमी झाला आहे. या प्रकरणी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरीर संबंधास नकार; महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न
घरगुती वादातून नवऱ्याने बायकोला मारहाण झाल्याच्या अनेक घटना घडतात. मात्र बायकोने रागाच्या भरात नवऱ्याला अगोदर झाडूने मारहाण केली अन् नंतर भाजी कापण्याच्या चाकूने हल्ला केल्याची घटना केडगावच्या भूषणनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पतीने दिलेल्या फिर्यादीवरून पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. त्यावेळी पती-पत्नी दोघेही घरी होते.

हुकूमशाही नाही तर विकास शाही, ठाकरेंच्या बॅनरबाजीला भाजपकडून सडेतोड उत्तर

पतीने पत्नीच्या पर्समधून पिस्ते काढून खाल्ले, त्याचा पत्नीला राग आला. संतप्त झालेल्या पत्नीने पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने हल्ला केला. यात पती गंभीर जखमी झाला. घटनेनंतर पतीने जखमी अवस्थेत पोलिसात धाव घेतली. घडलेला सर्व प्रकार त्याने पोलिसांना सांगितला. या प्रकरणी पोलिसांना पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *