विशाखापट्टणम : यशस्वी जैस्वालने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी एकट्याने भारताचा किल्ला लढवला. यशस्वीने या सामन्यात दमदार शतक झळकावले. त्याचबरोबर यशस्वीने या सामन्यात इतिहास रचला आहे. यशस्वीने या सामन्यात असा एक मोा विक्रम रचला आहे की जो आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला करता आलेला नाही.यशस्वीने भारताच्या डावाची दमदार सुरुवात केली. भारताचे फलंदाज एकामागून एक बाद होत राहीले. पण यशस्वीने मात्र खेळपट्टीवर ठाण मांडला आणि त्याने इंग्लंडच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. यशस्वीने यावेळी षटकारासह शतक झळकावत आपले इरादे स्पष्ट करून दाखवले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यशस्वीला एकाही फलंदाजाकडून जास्त वेळ साथ मिळाली नाही. पण तरीही यश्सवीने एकाकी झुंज देत हे शतक झळकावले. यशस्वीने या शतकासह एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यशस्वी हा विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध शतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. यशस्वीने ही कामगिरी वयाच्या २२ व्या वर्षी केली आहे. त्याचबरोबर या कसोटी स्पर्धेतील त्याचे हे दुसरे शतक ठरले आहे. यशस्वीने यावेळी सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. वयाच्या २२ व्या वर्षी दोन शतकं करण्याचा विक्रम यापूर्वी सुनील गावस्कल यांच्या नावावर होता. या विक्रमाशी यशस्वीने बरोबरी केली आहे. यशस्वीने वयाच्या २२ व्या वर्षी मायदेशात आणि परदेशात शतक झळकावण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सचिनने यापूर्वी २२ व्या वर्षी मायदेशात आणि परेदशात शतक झळकावले होते. रवी शास्त्री यांनीही अशीच कामगिरी २२ व्या वर्षीही केली होती. त्यामुळे यशस्वीने आता या दोघांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. यशस्वीने कसोटीच्या पहिल्याच दिवशी शत झळकावले आहे. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तो द्विशतक साकारणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.यशस्वी जैस्वालने पहिल्या कसोटीतही दमदार फलंदाजी केली होती. पण त्यावेळी त्याचे शतक हुकले होते. पण यशस्वीने या सामन्यात ती कसर भरून काढली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *