[ad_1]

मुंबई : कालपर्यंत महाविकास आघाडीसोबत असणारे, लोकसभेचं जागावाटप आणि राज्यसभेची रणनीती ठरविणारे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर अशोक चव्हाण यांना पायघड्या घालणाऱ्या भाजपवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं. आदर्श प्रकरणावरून अशोक चव्हाण यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगोलग माफी मागितली पाहिजे, अशी खोचक टोलेबाजी राऊत यांनी केली.

सुमारे चार दशकांहून अधिक काळ काँग्रेस पक्षात घालविल्यानंतर काँग्रेसचा हात सोडून काळानुरूप नवा पर्याय पाहिला पाहिजे, असे सांगत ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आज मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन आणि मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरित्या भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं. यावरूनच माध्यमांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारले. उत्तरादाखल संजय राऊत यांनी चव्हाण आणि भाजपवर जोरदार टोलेबाजी केली.

देश भ्रष्टाचारमुक्त करायला निघाला होतात, भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन पक्ष वाढवताय

अशोक चव्हाण भाजपत गेल्याने महाविकास आघाडीला कोणताही फटका बसणार नाही. जर फटका बसला तर भाजपला फटका बसेल. राज्यभरातून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लोक एकत्र करायचे आणि पक्ष वाढवायचा हे देशात पहिल्यांदाच घडतंय, असे सणसणीत टोले राऊतांनी लगावले. देश भ्रष्टाचारमुक्त करायला निघाला होतात, तुम्हीच एवढा चिखल माजवून ठेवला आहात. त्यामुळे आम्हाला कोणताही फटका बसणार नाही, असं प्रत्युत्तरही त्यांनी टीकाकारांना दिलं. त्याचवेळी राज्यसभा निवडणुकीची महाविकास आघाडीच्या वाटची जागा आम्ही निवडून आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अशोक चव्हाणांनी प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म भरला, बावनकुळेंनी फी घेऊन रितसर भाजपमध्ये प्रवेश दिला

नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांची माफी मागायला पाहिजे

कालपर्यंत आमच्यासोबत होते, चहापान करत होते, चर्चा करत होते, आता अचानक सोडून गेले. अशोक चव्हाण यांचा सहभाग असलेल्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केंद्र सरकारने काढलेल्या श्वेतपत्रिकेत करण्यात आला आणि चारच दिवसात अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यामुळे खोटे आरोप केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची माफी मागायला पाहिजे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *