[ad_1]

नवी दिल्ली : भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवातून महत्वाच्या गोष्टी शिकल्या आहेत. त्यानुसार आता भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळतील. पण रोहित शर्माने जर एकच बदल केला तर भारतीय संघाची चिंता मिटणार असल्याचे आता समोर आले आहे.भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल हा चांगल्या फॉर्मात आहे. पहिल्या कसोटीत त्याने दमदार धावा केल्या होत्या. पण रोहित शर्माला मात्र अर्धशतकही पूर्ण करता आले नव्हते. त्यामध्येच शुभमन गिल हा सातत्याने अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीसारखा अनुभवी खेळाडूही नाही. त्यामुळे भारतीय संघाला फार कमी वेळात तीन धक्के बसतात आणि त्यामुळे त्यांना मोठ्या धावसंख्येचा पाया उभारता येत नाही. कारण पहिल्या तीन खेळाडूंनी जर चांगली फलंदाजी केली तरच संघाला मोठी धावसंख्या उभारता येऊ शकते. त्यामुळे कसोटी सामन्यात पहिले तीन फलंदाज सर्वात महत्वाचे असतात. आता तर दुसऱ्या सामन्यात लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा हे मधल्या फळीतील अनुभवी फलंदाजही संघात नसतील. त्यामुळे दुसऱ्य कसोटीत भारताला थोडी संयमी फलंदाजी करावी लागेल. त्यासाठी रोहित शर्माची भूमिका या सामन्यात महत्वाची असेल जी संपूर्ण संघाच्या धावसंख्येला दिशा देऊ शकते. रोहित आणि गिल दोघेही चांगल्या फॉर्मात नाहीत, त्याचबरोबर संघात तीन अनुभवी फलंदाजही नाहीत. त्यामुळे रोहित शर्मा जर तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला आला आणि त्याने हा एक मोठा बदल केला तर भारतीय संघाची चिंता मिटू शकते. कारण गिलला सलामीला पाठवले आणि त्याची जागी बदलली तर कदाचित त्याच्या फलंदाजीत चांगले बदल पाहायला मिळू शकतात. दुसरीकडे रोहित हा तिसऱ्या स्थानावर येईल. यापूर्वी चेतेश्वर पुजारा हा या स्थानावर फलंदाजीला यायचा आणि भारताच्या धावसंख्येला आकार द्यायचा. हीच गोष्ट आता रोहित शर्माला करावी लागणार आहे. रोहित तिसऱ्या स्थानावर आला तर तोपर्यंत चेंडू थोडा जुना झालेला असेल आणि रोहितला सेट व्हायला जास्त वेळ मिळू शकतो. त्यामुळे रोहित शर्मा हा तिसऱ्या स्थानावर आला आणि गिलला सलामीला पाठवले तर भारतीय संघाला चांगला बदल पाहायला मिळू शकतो.गिल हा सलामीवीर आहे, पण रोहित संघात असल्यामुळे त्याला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला यावे लागते. पण रोहित तिसऱ्या स्थानावर आल्यावर साऱ्या गोष्टी ठीक होतील, अशी आशा चाहत्यांना आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *