[ad_1]

डोंबिवली : अनोळखींवर विश्वास ठेवणे डोंबिवलीकर आजोबांना चांगलेच महागात पडले आहे. भाजीपाला घेऊन घरी निघालेल्या एका वृध्दाला दोघा भामट्यांनी रस्त्यात गाठले. ॐ नम: शिवाय मंत्रजप करण्यास सांगून या वृध्दाला संमोहित केले. या वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि बोटातील अंगठी असा ५३ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज काढून घेऊन भामटे पसार झाले. सोमवारी सकाळी पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रोडला असलेल्या ॲपेक्स रुग्णालयासमोर हा प्रकार घडला.

दत्ताराम भिकाजी पार्टे (वय ७० वर्षे, रा. साजन हाईट्स, गरीबाचापाडा, डोंबिवली-पश्चिम) अशी फसवणूक झालेल्या वृध्दाचे नाव आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील बाजारातून भाजीपाला खरेदी करुन दत्ताराम पार्टे पायी आपल्या गरीबाचापाडा येथील घरी चालले होते. घनश्याम गुप्ते रोडने जात असताना ॲपेक्स रुग्णालयाच्या समोर दोन अनोळखी इसमांनी दत्ताराम यांना थांबिवले.

भारत बनला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था, चीनने अमेरिकेला मागे टाकले, जपान-रशिया आपल्या मागे
सोमवार असल्याने त्यांना ॐ नम: शिवाय असा भोलेनाथाचा नामजप करण्यास सांगितले. याच दरम्यान भामट्यांनी दत्ताराम यांना संमोहित केले. संमोहित झाल्यावर भामट्यांनी दत्ताराम यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, बोटातील अंगठी असा ऐवज काढून घेतला. दत्ताराम यांना बोलण्यात गुंतवणूक दोन्ही भुरटे घटनास्थळावरुन पळून गेले.

घरवापसी! अविनाश घोगरे यांचा पुन्हा मनसेत प्रवेश, पक्षाला शिरूर शहरात उभारी मिळणार
आपली फसवणूक दोन जणांनी केल्याचे कालांतराने भानावर आलेल्या दत्ताराम यांच्या लक्षात येताच त्यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली केली. असाच प्रकार काही महिन्यांपूर्वी दिव्यातल्या सिध्दार्थ रेसिडेन्सीत राहणारे अनिल डेविड तांबे (वय ७२ वर्षे ) यांच्या बाबतीत डोंबिवली पूर्व भागात रेल्वे स्थानक परिसरात घडला होता.

पोलीस विभाग, प्रशासन हादरले; पीडित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये घेतले विष, पोलीस निरीक्षकावर कारवाईची केली मागणी
बहुतांशी भामटे आणि भुरटे चोर शहराच्या बाहेरील ग्रामीण पट्ट्यात उभ्या राहिलेल्या बेकायदा चाळींमध्ये राहतात. त्यामुळे चोरी केल्यानंतर पळून जाणे आणि लपणे सहज त्यांना सोपे होते, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे अशा अनोळखी व्यक्तींच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नये, अन्यथा फसगत होण्याची शक्यता असते, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *