कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल ‘जवान’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. ‘पठाण’प्रमाणेच किंग खानच्या ‘जवान’चेही अनेक थिएटरबाहेर चाहत्यांनी जोरदार स्वागत केले. हा क्षण आणखी संस्मरणीय बनवत चाहत्यांनी मुंबईतील वांद्रे येथील प्रसिद्ध गेइटी गॅलेक्सी थिएटरच्या बाहेर ‘जवान’सोबत दहीहंडी साजरी केली.
‘दहीहंडी’ फोडण्याऐवजी ‘जवान’साठी चाहत्यांनी केले हे काम
मुंबईच्या गेइटी गॅलेक्सी थिएटरबाहेरील चाहत्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जिथे किंग खानच्या चाहत्यांनी त्याचा एक मोठा कट आउट तयार केला आहे, ‘जवान’ चित्रपटातील त्याच्या एका लूकचा हा कट आउट आहे. याशिवाय चाहत्यांनी ढोल-ताशांसह फटाक्यांच्या आतषबाजीत किंग खानच्या ‘जवान’चे स्वागत केले.
इतकेच नाही तर इन्स्टंट बॉलिवूडने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याच्या अनेक चाहत्यांनी ‘कृष्ण जन्माष्टमी’च्या खास प्रसंगी गेइटी गॅलेक्सी थिएटरच्या बाहेर एक दहीहंडीचे थर रचले. त्यावेळी त्यांनी पांढऱ्या टी-शर्टवर शाहरुख खानच्या ‘जवान’ ची प्रिंट छापली आणि दहीहंडी फोडण्याऐवजी शाहरूख खानच्या जवानाचा झेंडा दाखवला.
‘जवान’साठी चाहत्यांची क्रेझ पाहून यूजर्सनी प्रतिक्रिया
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर युजर्स किंग शाहरुख खानला मिळणाऱ्या प्रेमावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, “मी याआधी कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीची इतकी क्रेझ पाहिली नाही.” आणखी एका युजरने लिहिले की, “शाहरुख खानचा जवान का हा एखाद्या सणाप्रमाणे आहे”.
अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटात शाहरुख खान पहिल्यांदा नयनतारासोबत रोमान्स करताना दिसला आहे. या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसत आहे.