[ad_1]

कोल्हापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेची आज वर्षपूर्ती होत आहे. एकीकडे वर्तमानपत्रात येणाऱ्या मथळ्यासाठी आग्रही असणाऱ्या भाजपच्या नेत्यांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न अजूनही कळलेले नाहीत. भारतीय जनता पक्ष सत्ता काळात सपशेल फेल झाला आहे, अशी टीका काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केली. भारत जोडो यात्रा वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार पाटील बोलत होते.

मणिपूरच्या घटनेने देशाची मान शरमेने खाली गेली, ही घटना दडपण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते रोज वेगवेगळे विषय समोर आणत आहेत. भाजपने मुद्दामहून केलेली खेळी असून जनतेने या भूलथापांना बळी पडू नये. रक्षाबंधनच्या निमित्ताने स्वयंपाक गॅस दर दोनशे रुपयांनी कमी करण्यात आली, मात्र यापूर्वी कधी देशात रक्षाबंधन झालं नाही का? इतकी जाहिरात बाजी केंद्र सरकारकडून करण्यात आली हे कशासाठी? असा सवालही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

शिंदे सरकारने मराठ्यांसाठी GR काढला, पण जरांगे पाटील ‘सरसकट’वर अडले; उपोषणाबाबत मोठी घोषणा!

मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. मराठा बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने जमणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना समजली होती, मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास गृह विभाग कुठेतरी कमी पडला अशी शंका मनात येते, मराठा आरक्षणासारखा संवेदनशील विषय हाताळण्यात राज्यातील तिघाडी सरकार कमी पडलं आहे, आता मराठा आणि ओबीसी समाजात वाद लावण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडूनच केला जात आहे अशी टीकाही यावेळी आमदार पाटील यांनी केली.

मनोज जरांगे पाटील आंदोलन: शासनाने GR काढला, कोणत्या मराठ्यांना दाखले मिळणार? GR मध्ये काय लिहिलंय? वाचा…

जनतेचा काँग्रेसवर अजूनही विश्वास

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर जिल्ह्यात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रा काढण्यात येत आहे, या यात्रेलाही जिल्ह्यातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला सर्वसामान्यांच्या सोबत काँग्रेसची नाळ घट्ट जोडली गेली आहे, अजूनही काँग्रेसवर जनतेचा विश्वास असून येत्या 9 सप्टेंबरला कोल्हापुरात जनसंवाद यात्रा काढून काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.

कुणावर दुसऱ्याच्या दारात जायची वेळ येऊ देऊ नको, पंकजा मुंडेंचं अंबाबाईच्या चरणी मागणं

105 वाल्यांची परिस्थिती काय?

राज्यातील १०५ आमदार असलेल्या आणि सर्वात मोठा राजकीय पक्ष असा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाची आताची नेमकी परिस्थिती काय? आमदारांच्या डोळ्यात केविलवाण्या भावना दिसतात अशी खरमरीत टीका आमदार पाटील यांनी यावेळी केली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *