[ad_1]

मुंबई- बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह लवकरच नव्या ‘डॉन’च्या भूमिकेत दिसणार आहे. फरहान अख्तरने ‘डॉन ३’ ची अधिकृत घोषणा केली आहे. यावेळी अमिताभ बच्चन किंवा शाहरुख खान नाही तर रणवीर सिंह हा नवा डॉन असणार आहे. निर्मात्यांनी शीर्षक घोषणेसह याची घोषणा केली. आता रणवीर सिंहने ‘डॉन ३’ मध्ये कास्ट केल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांचाही त्याने आपल्या लांबलचक पोस्टमध्ये उल्लेख केला.

रणवीर सिंहने आपल्या लहानपणीचा एक गोंडस फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्याच्या हातात खेळण्यांचे पिस्तूल आणि त्याचे अप्रतिम भाव पाहायला मिळतात. या फोटोसोबत त्याने सांगितले की, आपण लहानपणापासूनच डॉनसाठी बनलो असल्याचे म्हटले आहे.

मुस्लिम मुलीशी लग्न करायला सुनील शेट्टीने केलेलं जीवाचं रान, वाचा त्याचा सुखी वैवाहिक मंत्र
डॉन ३ वर रणवीर सिंहची प्रतिक्रिया

‘डॉन ३’ बद्दल रणवीर सिंहने लिहिले की, ‘मी हा चित्रपट करण्यासाठी खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. लहानपणापासूनच मला चित्रपटांची आवड आहे. मी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्या चित्रपटांचा केवळ आनंदच घेतला नाही तर त्यांची मनापासून पूजाही केली आहे. हे दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीचे सिंह आहेत. मी त्यांना बघतच मोठा झालो आहे.

करन जोहर इज बॅक; रॉकी और रानी की प्रेम कहानी पाहून प्रेक्षकांची प्रतिक्रिया

शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांचा उल्लेख केला

त्याने पुढे लिहिले, ‘त्यांच्या कामगिरीचा माझ्यावर खूप प्रभाव पडला आहे. त्यांच्या कामातून मला खूप काही शिकायला मिळाले. आज मला त्यांचा वारसा मिळाला आहे. जे माझे बालपणीचे स्वप्न होते. माझ्यावर किती मोठी जबाबदारी आली आहे हे मी समजू शकतो. डॉनचे राज्य माझ्या खांद्यावर सोपवले आहे. मी कोणालाही निराश करणार नाही. फरहान आणि रितेश यांच्या प्रेम आणि विश्वासाबद्दल त्यांचे आभार. तसेच माझ्या चाहत्यांनी मला पाठिंबा दिला. शेवटी, मी एवढेच म्हणेन की मी बिग बी आणि शाहरुख खान यांना अभिमान वाटेल असेच करीन.

कॅनडियन पॉलाला पडली मराठमोळ्या सारंग साठेची भुरळ….आणि मग जन्मला आलं ‘भाडिपा’ हे बाळ
रणवीर सिंहला डॉन ३ कसा मिळाला

शाहरुख खानने यावेळी ‘डॉन ३’ करण्यास नकार दिला आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की रणवीर सिंहने शाहरुख खानला त्याच्या नावाची वकिली करायला लावली. तर काही ठिकाणी असे म्हटले आहे की रणवीर सिंहने फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांना ‘डॉन ३’ साठी अनेक मिटिंग आणि चर्चेत पटवून दिले होते की, डॉन ३ साठी आपणच योग्य आहोत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *