[ad_1]

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये गेल्या वर्षभरापासून विविध राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे ‘इनकमिंग’ सुरू असताना आता पहिल्यांदाच शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची यादी पुढे आली आहे. कांदिवली, चारकोप आणि मालाडमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनामे पाठवण्याबाबत पत्र पाठवले आहे.

शिवसेनेत फूट पडून आता जवळपास वर्ष होत आले असून, या कालावधीत उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनेक नगरसेवक व पदाधिकारी शिंदे यांच्या गटात येत आहेत. असे असताना आता त्यांच्याच पक्षातील कांदिवली, चारकोप, मालाडमधील पदाधिकाऱ्यांनी पत्र पाठवून राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. या पदाधिकाऱ्यांनी पत्रात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार सिद्धेश यांच्याविरोधात तक्रार केली आहे. ते पक्षात काम करू देत नसल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे आरोप करणाऱ्यांची संख्या ही तब्बल ३० ते ४० इतकी आहे. ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण कदमांना समज द्या’, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

शिवसेनेत फूट पडली, तरीही एकनिष्ठ राहिले, वर्षभरानंतर ‘वऱ्हाड’ ठाकरेंवर रूसलं, शिंदेंना यश!
‘आमच्या विधानसभा क्षेत्रात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सिद्धेश कदम यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मानसिक त्रास देत छळ करायला सुरुवात केली आहे. त्याला कंटाळून आम्ही राजीनामा देत आहोत’, अशी प्रतिक्रिया कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्राचे शिवसेना विभागप्रमुख विकास गुप्ता यांनी दिली. तर, मालाडचे विधानसभा संघटक नागेश आपटे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ‘मी मालाडमध्ये पक्षासाठी सुरुवातीपासून काम करत आहे. मात्र आता विनाकारण लोकांना पदावरून काढण्याचे काम सुरू असून पदाधिकारी चिंतेत आहेत. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा देणार आहोत’, असे आपटे म्हणाले.

Video : मराठी नाटकाला अर्धा तास उशीर, राजस्थानी प्रेक्षकांचा तुफान गोंधळ, गीता जैन यांचाही राडा
चारकोप विधानसभा क्षेत्राचे प्रमुख संजय सावंत म्हणाले की, ‘कांदिवली, चारकोप विधानसभा या भागातील आम्ही सर्व वरिष्ठ पदाधिकारी एकत्रितपणे सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहोत. सिद्धेश कदम यांचा हस्तक्षेप आणि गटबाजीला कंटाळून आम्ही हा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर पक्षात जी गटबाजी चालली आहे याबाबत निश्चित माहिती देऊ.’

हिंदुत्व मानणारे असे पळपुटे नसतात; अरविंद सावंतांनी डिवचलं, एका वाक्याने संसदेत राडा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *