नवी दिल्ली : रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांसाठी जडेजा आणि राहुल यांची निवड करत असताना बीसीसीआयने त्यांच्यापुढे एक मोठी अट ठेवल्याचे आता समोर आले आहे.

जडेजा आणि राहुल या दोघांना यापूर्वीही भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. जडेजाने पहिला सामना चांगलाच गाजवला होता. अष्टपूलै कामगिरीच्या जोरावर जडेजाने पहिल्या कसोटीत दमदार कामगिरी केली होती. पण या सामन्यात फलंदाजी करत असताना जडेजा हा धावचीत झाला आणि तिथेच त्याला गंभीर दुखापत झाली. जडेजाच्या पायातील स्नायू दुखावले गेले. जडेजाची ही दुखापत गंभीर होती. त्यामुळेच त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळता आले नाही. त्यानंतर जडेजा दुखापतींवर उपचार घेण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रवाना झाला होता. दुसरीकडे लोकेश राहुलदेखील पहिल्या सामन्यात खेळला होता आणि त्यानेही चांगली फलंदाजी केली होती. पण पहिल्या सामन्यात त्याला दुखापत झाली आणि त्यामुळे त्यालाही दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळता आले नाही. पण आता आगामी तीन कसोटी सामन्यांसाठी संघ निवडताना बीसीसीआयने त्यांना संघात स्थान दिले आहे. पण संघात स्थान देत असताना मात्र, बीसीसीआयने त्यांच्यापुढे एक मोठी अट ठेवल्याचे समोर आले आहे.

जडेजा आणि राहुलपुढे बीसीसीआयने कोणती अट ठेवली आहे, जाणून घ्या….

जडेजाने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दुखआपतींवर उपचार घेतले आहेत. काही दिवसांपूर्वी त्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. दुसरीकडे संघात येण्यासाठी लोकेश राहुलही प्रयत्न करत होता आणि तो दुखापतीमधून सावरला असल्याचे समोर आले आहे. पण जडेजा आणि राहुल दुखापतीमधून सावरले असले तरी त्यांना संघात येण्यासाठी एक मोठी गोष्ट करावी लागणार आहे. जडेजा आणि राहुल यांना आता फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. या टेस्टमध्ये ते जोपर्यंत पास होत नाहीत, तोपर्यंत त्यांना भारतीय संघात स्थान मिळणार नाही. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने ते फिट असल्याचे सांगितल्यावरच त्यांना संघात स्थान देण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे फिटनेस टेस्ट पास केल्यावरच जडेजा आणि राहुल या दोघांना भारतीय संघात स्थान देण्यात येणार आहे.

मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद पांड्याला, पुणेकरांच्या प्रतिक्रिया काय?

जडेजा आणि राहुल यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे ते संघासाठी महत्वाचे असतील. फिटनेस टेस्ट पास केल्यावर त्यांंना भारतीय संघात स्थान दिले जाईल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *