[ad_1]

नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला. या अविश्वास प्रस्तावारील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं. विरोध पक्षांनी केलेले आरोप खोडून काढत पंतप्रधान मोदींनी सडेतोड प्रत्युत्तर देत मणिपूरचा वापर राजकारणासाठी करू नका असं आवाहन केलं. पंतप्रधान मोदींचं भाषण संपल्यानंतर सभागृहात विरोधकांनी मांडलेला सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला.
सरकारच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला; काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींचे निलंबन
मणिपूरमधील परिस्थितीबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी सविस्तर माहिती दिली आणि भूमिका मांडली. सरकार आणि देशाची चिंता त्यांनी व्यक्त केली. देशातील जनतेला जागरूक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. विरोधी पक्षांकडून मणिपूरवर राजकारण केलं जात आहे, असा आरोप पीए मोदींनी केला. मणिपूरमध्ये गंभीर स्थिती आहे. तिथे अक्षम्य गुन्हे झाले आहेत. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. ज्या प्रकारे प्रयत्न सुरू आहेत, ते पाहता लवकरच शांततेचा सूर्य नक्की उगवेल, असा विश्वास पीएम मोदींनी व्यक्त केला.
नाव चोरले, इंडियाचे तुकडे केले; मोदींनी काँग्रेससह विरोधकांच्या नव्या आघाडीचा समाचार घेतला
‘देश आणि सभागृह मणिपूरसोबत’

संपूर्ण देश आणि सभागृह मणिपूरच्या जनतेसोबत आहे. मणिपूर पुन्हा विकासाच्या मुद्द्यांवर वाटचाल करेल. यासाठी सर्व प्रयत्न केले जातील. मणिपूरबाबत सभागृहात जे काही सांगितलं गेलं त्याने नागरिकांच्या मनाला ठेच पोहोचली आहे. तिथे भारतमातेची हत्या होतेय, असं काही लोकांना का वाटतंय, माहित नाही. हेच लोक संविधानाची हत्या होत असल्याचे बोलत आहेत. हैराण झालो आहे, असं बोलणारे हे कोण आहेत? देशाच्या फाळणीचा तो दिवस अजूनही आपल्याला वेदना देतो. हे तेच लोक आहेत ज्यांनी भारतमातेचे तीन तुकडे केले. भारतमाते भोवतीचे साखळदंड तोडण्याऐवजी त्यांनी हातच कापले, असा घणाघाती आरोप पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर केला.

‘ईशान्य भारत आमच्यासाठी महत्त्वाचा’

आमच्यासाठी ईशान्य भारत अतिशय खास आहे. मणिपूरमध्ये वंदे भारतपासून ते पहिल्या क्रीडा विद्यापीठाचा उल्लेख करत पीएम मोदींनी विकासकामांची माहिती दिली. सबका साथ सबका विकास ही फक्त घोषणा नाही तर आमचा विश्वास आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *