[ad_1]

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानचा सामना काही तासांवर येऊन ठेपला आहे. पण भारत आणि पाकिस्तानचा सामना सुरु होण्यापूर्वी आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कारण या सामन्यापूर्वी आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे आता रविवारी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता. या दुसऱ्या सामन्याचा निकाल लागावा आणि चाहत्यांचा हिरमोड होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. पण आता एक मोठी बातमी समोर येऊन धडकली आहे. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांसाठी ही एक गुड न्युज आहे.

भारत आणि पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात होते. पण आता हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. काही दिवस कोलंबोमध्ये पावसाचे वातावरण होते, त्यासाठीच भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला होता. पण आता कोलंबोमधील वातावरण सुधारले आहे. आशिया क्रिकेट कौन्सिलने आता आपल्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो भारत आणि पाकिस्तान सामना जिथे होणार आहे, त्या कोलंबोच्या मैदानाचा आहे. या मैदानात आता काळे ढग दिसत नाहीत, आकाश पूर्णपणे निरभ्र दिसत आहे. त्यामुळे कोलंबोमध्ये आता पावसाचे चिन्ह नाही. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला राखीव दिवसाची गरज पडणार नाही, असे आता दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांना आता १० सप्टेंबर या दिवशी कोणत्याी व्यत्ययाशिवाय हा सामना पाहता येऊ शकतो. त्यामुळे आता या सामन्यात कोणता संघ कशी कामगिरी करतो आणि कोणता संघ विजयी ठरतो, याची उत्सुकता सर्वांनाच असणार आहे.

नेपाळच्या क्रिकेटपटूंचा भारतीय टीमनं केला गौरव

भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात आता पावसाचे चिन्ह नसल्यचा म्हटले जात आहे. त्यामुळे हा सामना १० सप्टेंबरला निर्विघ्न पार पाडू शकतो. त्यामुळे चाहत्यांना आता रविवारी सुट्टीच्या दिवशी या सामन्याचा मनमुराद आनंद घेता येऊ शकतो.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *