[ad_1]

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेतील भाषण, महाराष्ट्रात राजकीय नेत्यांसोबतचा गुंडांचा वावर याबाबत भाष्य केलं. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. लडाखमध्ये प्रचंड मोठं आंदोलन सुरु आहेत. मणिपूरमध्ये गेल्या दोन वर्षांपासून हिंसेचा उद्रेक आहे. जम्मू काश्मीरमध्ये लोक रस्त्यावर आहेत. दिल्लीत ईव्हीएमविरोधात प्रचंड मोठं आंदोलन सुरु आहे. देशातील कायदा व्यवस्था ढासळलीय. चीननं घुसखोरी केली आहे, या सर्व मुद्यांवर नरेंद्र मोदी यांनी भाषणात भाष्य केलं का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

महाराष्ट्रासारखं मोठं राज्य गुंडगिरीचा सर्वात मोठा अड्डा झालेला आहे. बेकायदेशीरपणे नेमलेले मुख्यमंत्री गुंडांना पोसतात यावर नरेंद्र मोदी बोलले का? मोदी ७८ मिनिटं पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांच्यावर टीका करत राहिले. किती काळ तुम्ही काँग्रेसवर बोलणार, तुम्ही काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा. इतक्या वर्षानंतरही भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या मनातील काँग्रेसची भीती जात नाही.नेहरुंनी केलेल्या कामाची भीती जात नाही. याला राष्ट्रपतींच्या भाषणावरील चर्चा कसं म्हणता, असा सवाल संजय राऊत यांनी केला..

देशात शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. महाराष्ट्रात शिंदेंचं सरकार आल्यापासून १७०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मोदींनी त्याच्यावर एक शब्द तरी उच्चारला का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

भाजप देखील एकाच प्रॉडक्टवर चाललेला आहे. भाजपकडे मोदींशिवाय दुसरं प्रॉडक्ट आहे का? तुम्ही कसल्या गोष्टी करता असा सवाल राऊत यांनी केला. हा देश हुकूमशाहीकडे चाललेला आहे. हुकूमशाही कोणत्या थराला गेलेली आहे हे चंदीगडच्या महापौर निवडणुकीत भाजपनं केलेल्या घोटाळ्याचं चित्रण पाहिल्यावर कळेल, असं संजय राऊत म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाचा आम्ही आदर करतो. महाराष्ट्राच्या प्रकरणातही त्यांनी झापलं होतं. झापाझापीचं स्वागत करतो पण निर्णयाचं काय, असा सवाल संजय राऊत यांनी केला. सर्वोच्च न्यायालयानं झापून देखील राहुल नार्वेकर यांनी मनमानी केली. सरळ सरळ संविधान पायदळी तुडवण्यात आलं, १० वी अनुसूची पायदळी तुडवण्यात आली. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा आदर आहे पण झापण्याच्या पलीकडील पावलं टाकली पाहिजेत, असं संजय राऊत म्हणाले.
पोलिसांसमोरच सत्ताधाऱ्यांचे गँगवॉर, फडणवीसांनी राजीनामा द्यावा, गोळीबार प्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक
गेल्या ७० वर्षा जो देश उभा राहिला त्याची फळं नरेंद्र मोदी आणि भाजपवाले खातात, असं संजय राऊत म्हणाले. बेरोजगारांना पकोडे तळण्याचा सल्ला दिला जातो, यावरुन देश कुठे घेऊन जात आहात. ८० कोटी जनतेला ५ किलो मोफत धान्य देता हे लोकांना गुलाम करण्याचा प्रयत्न आहे. शेतमालाला हमीभाव हवाय, याच्यावर बोला, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

संविधानिक संस्था ज्या पद्धतीनं संपवलं जात आहे. त्यावर बोललं पाहिजे. ८० कोटी जनतेला गुलाम बनवण्याचा प्रयत्न असं संजय राऊत म्हणाले. यापुढे दररोज सरकारच्या गुंडगिरीची माहिती देत राहणार आहे. त्या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टॅग केलं आहे.
सोमय्यांची मिमिक्री,गणपत गायकवाडांच्या वक्तव्याचा आधार,एकनाथ शिंदेंवर ईडीनं कारवाई करावी, संजय राऊतांची मागणी
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गुंड टोळ्या भेटत आहेत. खून, बलात्कार, दरोडे या प्रकरणातील गुंड टोळ्या मुख्यमंत्र्यांना भेटून काय चर्चा करत आहेत. या गुंड टोळ्यांचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करणार आहेत की विरोधकांचे मुडदे पाडण्यासाठी करणार आहेत, असा सवाल संजय राऊत म्हणाले.
निवडणुकांसाठी गुंडांना जामिनावर सोडलं; रामावर हक्क सांगता, तर कायद्याचं राज्य कधी? राऊतांचे फडणवीसांना सवाल
Read Latest Maharashtra News And Marathi News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *