[ad_1]

पेशावर: एका प्रसिद्ध गझलमध्ये म्हटलं आहे की, ‘ना उम्र की सीमा हो, ना जन्‍म का हो बंधन’ आहे आणि हेच पाकिस्तानातील एका व्यक्तीने आपल्या आयुष्यात लागू गेल्या आहेत. येथे खैबर पख्तुनख्वा येथील एका ९५ वर्षीय व्यक्तीने दुसरं लग्न केलं आहे. पाकिस्तानातील हे लग्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. खैबर पख्तुनख्वाच्या मनसेहरा जिल्ह्यातील मोहम्मद झकारिया आता त्याच्या दुसऱ्या लग्नात खूप आनंदी आहेत. त्यांच्या लग्नाला त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह जवळचे लोकही उपस्थित होते. नातेवाईकांनीही त्यांना दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

२०११ मध्ये पहिल्या पत्नीचे निधन

मनसेहरा येथील पखवाल चौकात राहणारे झकेरिया यांच्या पत्नीचं २०११ मध्ये पहिली पत्नी गमावली होती. झकेरिया यांचा बियाणांचा व्यवसाय असून ते एक यशस्वी व्यावसायिक आहेत. त्यांच्या पहिल्या लग्नापासून त्यांना सात मुलं, पाच मुली आणि असंख्य नातवंडे आहेत. असे असूनही, पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांना अनेक वर्षे एकटेपणा जाणवत होता. अनेक वर्षांपूर्वी मोहम्मद झकारिया यांनी त्यांच्या मुलांसमोर दुसऱ्या लग्नाची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांना मोठ्या नाराजीचा सामना करावा लागला होता. त्यांच्या मुलांनी या लग्नाला विरोध केला. पण दुसऱ्या लग्नाची इच्छा झकेरियाच्या मनात कायम होती.

भुतांचं गाव! शाप दिला अन् अचानक निर्मनुष्य झालं हे गाव, नाव ऐकूनच थरथर कापायला लागतात लोक
अखेर इच्छा पूर्ण झाली

अखेर आता त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे. त्याच्या धाकट्या मुलाला त्याच्या वडिलांची इच्छा समजली. यानंतर त्याच्यासाठी योग्य वधू शोधण्याचे काम सुरू झाले. मोहम्मद झकेरियाप्रमाणेच त्यांची दुसरी पत्नीही विधवा आहे. मनसेहरा येथील एका हॉलमध्ये वृद्ध जोडप्याच्या लग्न सोहळा पार पडला.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

कुटुंब-नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

त्यांनी विवाह प्रमाणपत्रावर सही करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर या लग्नाबाबत लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण या लग्नाचे समर्थन करत आहेत तर काही लोक त्यांच्या लग्नाची खिल्ली उडवत आहेत.

[ad_2]



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *