[ad_1]

बँकॉक: एका यूट्यूब सेलिब्रिटीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर बॉयफ्रेण्डची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याच्या शरीराचे तुकडे करुन ते सुटकेसमध्ये टाकल्याचा आरोप आहे. हे प्रकरण थायलंडचं असल्याची माहिती आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांसमोर धक्कादायक सत्य आलं आहे. गुप्तहेरांच्या मते, डॅनियल सांचो ब्रोंचलोने त्याचा माजी प्रियकर एडविन अरिएटा आर्टेगाची हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि मग ते सुटकेसमध्ये टकून समुद्रात फेकले.

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, डॅनियलवर पोलिसांनी गेल्या आठवड्यात थायलंडमधील कोह फांगनान बेटावर त्याच्या प्लास्टिक सर्जन मित्राची बेदम मारहाण करुन त्याची हत्या केल्याचा आरोप केला आहे. अधिकार्‍यांचा दावा आहे की अर्टेगाच्या शरीराचे काही भाग रस्त्यावरून जाणाऱ्यांना ३ ऑगस्ट रोजी कचराकुंडीत सापडले होते.

उत्खननात मुलीला सापडला १५०० वर्ष जुना जादूचा आरसा, पाहा कसा दिसायचा, वापर ऐकून चक्रावाल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय डॅनियलचे सोशल मीडियावर १२,४०० फॉलोअर्स आहेत. तो ३१ जुलैपासून थाई रिसॉर्टमध्ये होता, परंतु अलीकडेच त्याचे कोलंबियन प्रियकराशी भांडण झाले. दोघेही एक वर्षाहून अधिक काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. असे मानले जाते की हे जोडपं फुल मून पार्टीत सहभागी होण्यासाठी या बेटावर गेले होते. डॅनियल त्याच्या मित्रांसोबत पार्टी करण्यापूर्वी एडविनची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर तो हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.

डॅनियलने एडविनचा मृतदेह समुद्रात फेकल्याचा गुप्तहेरांचा दावा आहे, असे बँकॉक पोस्टने वृत्त दिलं आहे. तपासाअंती त्याचे डोके आणि हात समुद्रातून बाहेर काढल्याचं समजतं. तर, रविवारी डॅनियल आणि पोलिस समुद्रकिनाऱ्यावर गेले, जिथे पोलिसांना प्रियकराचा मृतदेह सापडला होता. त्याने बेटावरील एका दुकानातून चाकू, प्लास्टिकच्या पिशव्या आणि साफसफाईचे सामान खरेदी केल्याचंही पोलिसांना समजले.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

डॅनियल हा मूळचा स्पेनचा रहिवासी असून त्याला ताब्यात अटक करण्यात आले आहे. सोमवारी (७ ऑगस्ट) त्याला थायलंड न्यायालयात हजर करण्यात आले. स्थानिक पोलिस अधिकार्‍यांनी पुष्टी केली आहे की त्याच्यावर पूर्वनियोजित खून आणि गुप्त वाहतूक किंवा मृतदेह नष्ट करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यासोबतच मृत्यू आणि त्याचे कारण लपवल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
पायलट बाप दारु ढोसत होता, ११ वर्षांच्या पोराकडे विमानाची कमान, क्षणात होत्याचं नव्हतं, VIDEO समोर

[ad_2]Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *