[ad_1]

नवी दिल्ली: मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या चर्चेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना प्रत्युत्तर देणार आहे. मोदी दुपारी ३च्या सुमारास लोकसभेत दाखल झाले. तेव्हा काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी बोलत होते.

मोदी लोकसभेत आल्यानंतर चौधरी म्हणाले, अविश्वास प्रस्तावाची ताकद तरी बघा आम्ही मोदींना संसदेत येण्यास मजबूर केले. हीच संसदीय परंपरेची ताकद आहे. आमची इच्छा होती की मोदींनी मणिपूरवर चर्चेवर सहभाग घ्यावा. पण त्यांनी माहित नाही का संसदेत न येण्याची शपथ घेतली होती. आम्ही आधी अविश्वास प्रस्ताव आण्याचा विचार करत नव्हतो. पण अखेर तो आणावा लागला.

देशाचे प्रमुख या नात्याने मोदींनी मणिपूरच्या लोकांसमोर मन की बात केली पाहिजे होती. ही मागणी काही चुकीची नव्हती. ही मागणी सर्वसामान्य जनतेची होती. मोदी १०० वेळा देशाचे पंतप्रधान होऊ देत आम्हाला त्याचे काही नाही. आमचा संबंध देशाच्या जनतेशी आहे.

राजा अंधळा असतो तेव्हाच…

मणिपूरच्या घटनेचा उल्लेख करताना चौधरी म्हणाले, जेथे राजा अंधळा असतो तेथे द्रौपदीचे चीरहरण होते. यावर गृहमंत्री अमित शहा यांनी आक्षेप घेतला. तुम्ही पंतप्रधानांबद्दल असे बोलू शकत नाही. यावर चौधरी म्हणाले, पंतप्रधान मोदी प्रत्येक विषयावर काही ना काही बोलत असतात. पण मणिपूरवर ते गप्प आहेत. हे काही बरोबर नाही. मणिपूरचे दोन खासदार आहेत, त्यांना बोलण्याची संधी दिली जात नाही. आम्ही अमित शहांना विचारतो, त्यांनी केलेली वक्तवे घातक होती.

मोदींची तुलना नीरव मोदीशी केली

चौधरी एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी PM मोदींची तुलना थेट नीरव मोदी याच्याशी केली. नीरव मोदी विदेशात फिरत असतो. त्याचे फोटो पाहिल्यानंतर नीरव मोदी विदेशात गेला असे वाटले आणि त्यानंतर असे वाटते की, नीरव मोदीला पाहिल्यानंतर नरेंद्र मोदी दिसतात. चौधरी यांच्या या वक्तव्यावर भाजपच्या सर्व खासदारांनी जोरदार विरोध केला. यामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *