[ad_1]

मुंबई : मोहम्मद सिराजने सहा विकेट्स घेत आशिया चषक भारताला एकहाती जिंकवून दिला. दुसरीकडे जसप्रीत बुमराहने दमदार पुनरागमन केले आहे आणि तो भन्नाट फॉर्मात आला आहे. सिराज आणि बुमराह हे दोघे सध्याच्या घडीला चांगलेच चर्चेत आहेत. पण भारताचा कर्णधार रोहित शर्माला सिराज आणि बुमराह यांच्यापेक्षा भारतीय संघातील एका वेगळ्याच गोलंदाजाची जास्त काळजी आहे. ऑस्ट्रेलियच्या वनडे मालिकेसाठी जेव्हा भारताचा संघ निवडला गेला तेव्हा रोहितने ही गोष्ट बोलून दाखवली.

मोहम्मद सिराज हा वर्ल्ड कपपूर्वी भन्नाट फॉर्मात आला आहे. आशिया कपच्या अंतिम फेरीत सिराजने तब्बल सहा विकेट्स घेत श्रीलंकेला धुळ चारली होती. त्यामुळे सिराजची अजूनही जोरदार चर्चा सुरु आहे. दुसरी गोष्ट भारतासाठी सर्वात महत्वाचा गोलंदाज समजला जातो तो जसप्रीत बुमराह. तो आता दुखापतीनंतर संघात परतला आहे. संघात पुनरामगन करत त्याने भन्नाट कामगिरीही केली आहे. पण तरीही रोहितला सिराज आणि बुमराह यांच्यापेक्षा एका खेळाडूची सर्वात जास्त काळजी असल्याचे आता समोर आले आहे.

रोहित शर्मा म्हणाला की, ” वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या संघात २८ सप्टेंबरपर्यंत बदल करण्याची मुभा आहे. त्यासाठी आयसीसीची मंजुरी घेण्याचे बंधन नाही. त्यानंतरच्या बदलास मात्र आयसीसीची मंजुरी आवश्यक असेल. कुलदीप यादव दीड वर्षापासून नियमीतपणे खेळत आहे. वर्ल्ड कपपूर्वी त्याला चांगली लय गवसणे महत्त्वाचे आहे. आता त्याला विश्रांती दिली असली तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी लढत आणि वर्ल्ड कपपूर्वीचे दोन सराव सामने खेळण्याची संधी लाभणार आहे. या सामन्यातून त्याला लय गवसणार आहे.”

श्रीलंकेला धूळ चारली, टीम इंडियाचे खेळाडू कलिना एअरपोर्टवर स्पॉट

रोहित कर्णधार झाल्यापासून कुलदीपला संधी मिळत गेली. कारण विराट कोहली कर्णधार असताना कुलदीपला जास्त संधी मिळत नव्हती. पण रोहित कर्णधार झाला आणि गेल्या दीड वर्षात त्याला सातत्याने संधी मिळत आहे. या गोष्टीचे चांगले फळही भारताला मिळाले आहे. कारण कुलदीप हा चांगल्या फॉर्मा आला आहे आणि वर्ल्ड कपमध्ये तो भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज ठरू शकतो.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *