[ad_1]

पुणे : खेड तालुक्यातील चाकण येथील माणिक चौक येथे आज सकाळी वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला हायवा गाडीने धडक दिली. या घटनेत वाहतूक पोलिसाचा रस्त्यावर पडून मृत्यू झाला. सकाळी कामावर जाताना हा अपघात झाला आहे. या घटनेत शासकीय कर्मचाऱ्याचा बळी गेला असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. योगेश गणपत ढवळे ( वय ४०) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. अचानक झालेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ढवळे हे ” पंच प्राण शपथ” घेण्यासाठी कार्यालयात जात होते. त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली.

पंच प्राण शपथ हा सोहळा देशभरातील सरकारी कार्यालयामध्ये केंद्र सरकारच्या ” मेरी माती मेरा देश” या कार्यक्रमाच्या भाग म्हणून आयोजित केला जात आहे. त्यासाठीच ढवळे जात असताना ही घटना घडली आहे.
एकनाथ शिंदे यांना झटका, वारं फिरलं, आतापर्यंत इनकमिंग होतं, आता आऊटगोईंगला सुरूवात!
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळच्या सुमारास वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी योगेश गणपत ढवळे हे कामावर जात होते. चाकण येथील माणिक चौकात आल्यानंतर मोटार सायकल क्रम. एम एच १४ सी एफ ६४८० या गाडीवरून चाकण विभागाकडे येत असताना एच पी पेट्रोल पंपास्मोर हायावा गाडी क्र. एम एच १४ जे एल ९९३६ हिने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारा अगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. ते या अपघातात गंभीर जखमी झाले होते.
Rahul Gandhi Loksabha Speech: भारतमाता माझी आई, भाजपकडून तिचीच हत्या, मणिपूरवरुन संसदेत राहुल गांधी आक्रमक
त्यांच्या जाण्याने वाहतूक पोलिसांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले असून मित्र परिवाराला यामुळे धक्का बसला आहे. योगेश हे सर्वांशी मिळून मिसळून राहणारे असे व्यक्तिमत्व होते. कुणाच्या मनातही नसतानाही ही घटना घडली आहे. योगेश ढवळे यांच्या अकाली निधनामुळं त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

राहुल गांधींकडून संसदेत फ्लाईंग किस, स्मृती इराणींचा गंभीर आरोप, लोकसभा अध्यक्षांना काय म्हणाल्या?

इंदापूर दुर्घटनेतील विहिरीत पडलेल्या मजुरांचा मृत्यु, चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह सापडले

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *