[ad_1]

नवी दिल्ली : धगधगत्या मणिपूरवरून केंद्र सरकारचे वाभाडे काढणारे खासदार राहुल गांधी पुन्हा अडचणीत सापडले आहेत. त्यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. आतापर्यंत कुठल्याही खासदाराने असं लज्जास्पद वर्तन सभागृहात केलं नव्हतं. राहुल गांधी यांच्या वर्तनाने आज शरमेने मान खाली गेल्याची टिप्पणी करत महिलांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधी यांना सभागृहात येण्याचा अधिकार आहे का? असा सवाल स्मृती इराणी यांनी केलाय.

लोकसभेत नेमकं काय घडलं?

केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी धुव्वाँधार भाषण करत केंद्र सरकारवर टीकेचे प्रहार केले. भारतमाता ही माझी आई आहे. मणिपूर हे भारताचं अविभाज्य अंग आहे. या सरकारने मणिपूरचे दोन तुकडे केलेत. म्हणजे या सरकारने माझ्या आईचेच तुकडे केले आहेत, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. सुमारे अर्ध्या तासाच्या भाषणात त्यांनी भारत जोडो यात्रा, अदानी प्रकरण आणि धगधगत्या मणिपूरला स्पर्श केला.

राहुल गांधींकडून संसदेत फ्लाईंग किस, स्मृती इराणींचा गंभीर आरोप, लोकसभा अध्यक्षांना काय म्हणाल्या?
राजस्थानवर दौऱ्यावर जायचे असल्याने राहुल गांधी यांनी आपले भाषण आटपून लगोलग लोकसभेच्या बाहेर पडणे पसंत केले. तत्पूर्वी लोकसभेतून जाताना त्यांच्या हातातले काही कागदपत्रे खाली पडली. संबंधित कागदपत्रे घेण्यासाठी ते खाली वाकले. त्यावेळी भाजप खासदार त्यांच्यावर फिदीफिदी हसले. त्यावर राहुल गांधी यांनी समोरील सत्ताधारी भाजप खासदारांकडे पाहून स्मितहास्य केलं आणि फ्लाईंग किसप्रमाणे इशारा केला, अशी माहिती ‘मटा’च्या विशेष प्रतिनिधींनी दिली. दरम्यान, लोकसभेच्या एक्झिट दरवाजाजवळ कोणताही कॅमेरा नसल्याने हा प्रसंग चित्रित होऊ शकला नाही.

राहुल गांधी भाषण आटपून निघाले त्यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी नुकत्याच बोलायला उभ्या राहिल्या होत्या. त्यांनी आपल्या संपूर्ण भाषणात काँग्रेसच्या धोरणांवर सडकून प्रहार केले तसेच राहुल गांधी यांना लक्ष्य केले. सरतेशेवटी भाषण संपविताना त्यांनी राहुल गांधी यांच्या फ्लाईंग किस प्रकरणाकडे सभागृहाचं लक्ष वेधले. तोपर्यंत राहुल गांधी यांना लोकसभेबाहेर पडून सुमारे अर्ध्या तासांहून अधिक काळ लोटून गेला होता. अर्ध्या तासांनंतर स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या कृत्यावर आक्षेप घेत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

एकनाथ शिंदे यांना झटका, वारं फिरलं, आतापर्यंत इनकमिंग होतं, आता आऊटगोईंगला सुरूवात!
स्मृती इराणी नेमके काय म्हणाल्या?

असं कृत्य केवळ महिलाद्वेषी मनुष्यच करू शकतो. संसदेत असं कृत्य करणं अशोभणीय आहे. राहुल गांधी यांच्या कृत्याने संसदेची गरिमा राहिलेली नाही. याआधी असं कृत्य कोणत्याही खासदाराने केलेलं नाहीये. लोकसभेचे सभागृह, जिथे महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी कायदे केले जातात, तिथेच राहुल गांधी यांचे अभद्र वर्तन संपूर्ण देशाने पाहिले आहे. अशा माणसाला सभागृहात पाऊल ठेवण्याचा अधिकार आहे काय? असा सवाल इराणी यांनी विचारला.

‘फ्लाईंग किस’ प्रकरण तापलं; राहुल गांधींचा कथित व्हिडिओ समोर

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *