[ad_1]

कोलंबो : पावसानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपमधील सामना सुरु होणार आहे. पाऊस थांबल्यावर मैदानात सुकवण्यात आले आहे. त्यांनतर हा सामना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण आता पावसानंतर खेळ सुरु करायचे ठरवले आहे आणि त्यासाठी आता समीकरणही समोर आले आहे.

पावसामुळे जेव्हा खेळ थांबवण्यात आला तेव्हा राहुल १७ आणि विराट कोहली हा ८ धावावंर खेळत होता. त्यावेळी भारताची २ बाद १४७ अशी स्थिती होती. पावसामुळे पाकिस्तानचा संघ जर फलंदाजीला आला तर त्यांना भारतासारखीच २४ षटके खेळायला दिली जातील. या २४ षटकांमध्ये पाकिस्तानला विजयासाठी २०६ धावांचे आव्हान देण्यात येईल. पण जर हा सामना २० षटकांचा खेळवण्यात आला तर पाकिस्तानला विजयासाठी १८१ धावांचे आव्हान दिले जाईल. त्यामुळे पाऊस हा भारताच्या पथ्यावर पडू शकतो. पण याबाबतचा अंतिम निर्णय हा मैदानातील पंच आणि सामनाधिकारी घेतील. त्याचबरोबर या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा सामना सोमवारीही खेळवला जाऊ शकतो.

पाऊस थांबला आणि त्यानंतर मैदान सुकवण्याचे काम सुरु झाले. मैदानातील दोन्ही पंच हे काम पाहत होते. त्यानंतर दोन्ही पंचांनी यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना हा सामना नेमका किती षटकांचा होईल, हे सांगितले. त्यानुसार हा सामना आता प्रत्येकी ३४ षटकांचा होणार आहे.

आशिया चषक: भारत व पाकिस्तान यांचा आज सामना

भारत आणि पाकिस्तान हा या आशिया चषकातील असा एकमेव सामना आहे ज्याच्यासाठी नियम बदलण्यात आले आहेत. कारण या सामन्यासाठी खास राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचा व्यत्यय आला तरी हा सामना पूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या सामन्यात चाहत्यांची निराशा मात्र होणार नाही. त्यामुळे आता हा सामना पूर्ण होणार हे निश्चित असले तर तो कधी आणि किती वाजता, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. पण आता चाहत्यांन सर्व माहिती मिळाली आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *