कोलंबो : भारताने श्रीलंकेवर विजय साकारला आणि त्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. कारण आशिया कपमध्ये हा सामना महत्वाचा होता. या महत्वाचा सामना संपवल्यावर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.या सामन्यापूर्वी गुणतालिकेत भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान या तिन्ही संघांचे समान दोन गुण होते. पण नेट रन रेटच्या जोरावर भारतीय संघ अव्वल स्थानावर विराजमान होता. या गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ दुसऱ्या स्थानावर होता आणि पाकिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानावर होता. या सामन्यात भराताने विज मिळवला. या विजयानंतर भारताला दोन गुण मिळाले आहेत. त्यामुळे आता भारतीय संघाचे दोन विजयांसह चार गुण झाले आहेत. त्यामुळे भारतीय संघ चार गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. आतापर्यंत गुणतालिकेत चार गुण पटकावलेला भारताचा पहिला संघ आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान यांचे समान २ गुण आहेत. पण त्यांचा एकच सामना बाकी आहे आणि त्यामुळे जो जिंकेल त्याचे चार गुण होतील. त्यामुळे जो पराभव होईल त्याचे दोन गुणच राहतील. त्यामुळे या सामन्यात जो जिंकेल त्याचा सामना भारताशी होणार आहे. जर पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला असता तर त्याचा मोठा परीणाम या स्पर्धेवर होऊ शकला असता. कारण जर आता हा सामना पावसामुळे रद्द झाला असता तर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांना समान एक गुण मिळाला असता. त्यानुसार भारतीय संघाचे तीन गुण होऊ शकले असते आणि ते गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम राहीले असते. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाचेही तीन गुण झाले असते आणि ते दुसऱ्या स्थानावर कायम राहिले असते. पण जर असे घडले असते पाकिस्तानला त्याचा मोठा फटका बसू शकला असता. कारण ते दोन गुणांवर कायम राहीले असते. पण तसे घडले नाही आणि त्यामुळे आता पाकिस्तानला अंतिम फेरीत पोहोचायची संधी असेल. भारताच्या विजयानंतर आता फायनलमध्ये कोणता संघ कसा पोहोचू शकतो, हे स्पष्ट झाले आहे.